Nigadi Molestation Case : विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – निगडी येथे विनयभंगाची (Nigadi Molestation Case) घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

हरीशचंद्र कुथूगौतम (वय 35 वर्षे, रा काळभोरनगर, आकुर्डी गावठाण) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Eknath Shinde Update : अखेर संवाद झाला! मला मंत्रिपद नको पण भाजपसोबत युती करा!

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.20 जून) फिर्यादी लिफ्टच्या समोर उभे असताना तिथे त्यांच्या मागे कुथूगौतम येऊन उभा राहिला. लिफ्टमध्ये सुद्धा फिर्यादी यांच्या मागे थांबत कुथूगौतम त्यांना पाठीमागून मिठी मारून त्यांचा विनयभंग (Nigadi Molestation Case) केला.

याप्रकरणी आरोपीविरोधात भा. द. वि. कलम 354, 354(डी ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.