Eknath Shinde Update : अखेर संवाद झाला! मला मंत्रिपद नको पण भाजपसोबत युती करा!

एमपीसी न्यूज : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांची अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत वीस मिनिटे फोनवर चर्चा झाली. त्यात त्यांनी पक्ष न सोडल्याचे म्हंटले असून, मला मंत्रीपद नको पण भाजपसोबत सरकार बनवा, ही माझी नाही तर इतर आमदारांची इच्छा आहे. अत्यंत भावनिकरित्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत संवाद साधला आहे. 

या फोनमध्ये त्यांनी म्हंटले, की मला विश्वासात न घेता गद्दार संबोधले जाते आहे. गेल्या 24 तासात मी तुमच्यासाठी वाईट कसा झालो? मी कोणत्याही पक्षासोबत गेलो नाही, हातमिळवणी केली नाही. कोणतेही तसे निवेदन आले नाही. मग मला गद्दार का म्हंटले जात आहे. माझे पुतळे का जळाले जात आहेत? मला गटनेते पदावरून का हटवले गेले? याची उत्तरे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितली.

Chandrakant Patil : एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण

तर, पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीसाठी (Eknath Shinde Update) त्यांनी आग्रह धरला. मला कोणतेही मंत्रिपद नको. पण, भाजप बरोबर पुन्हा युती व्हावी. हे माझ्यासाठी नाही, तर पक्षहितासाठी मी बोलत आहे. इतर आमदारांची देखील हीच इच्छा आहे. या सर्वांवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना म्हंटले, की तुम्ही घरी या आपण सविस्तर यावर चर्चा करू आणि एकमताने ठरवू. तुम्ही काळजी करू नका असेही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.