Kidnapping Case : पिंपळे सौदागर येथे मुलाचे अपहरण; चारजण अटकेत

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारात एका मुलाचे अपहरण (Kidnapping Case) करण्यात आले. याप्रकरणी कसून चौकशी करत चौघांना अटक करण्यात आली आहे. 

राज राठोड (वय 28 वर्षे, रा. दापोडी), मुन्नीलाल चौहान (रा. बाणेर), राजू यादव (वय 30 वर्षे, रा. बॅनर), विनोद यादव (वय 36, रा. बाणेर) या चार जणांना अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत रमाकांत वर्मा (वय 27 वर्षे, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे.

Ashadhi Wari 2022 : जाणून घ्या पालखी सोहळ्यातील वाहतूक निर्बंध!

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राज राठोड यांनी फिर्यादीला अॅडव्हान्स म्हणून 8000 रुपये दिले होते, मात्र ते पैसे परत न केल्यामुळे त्यांनी त्यांच्या मारुती सुझुकी सियाज या कारमध्ये फिर्यादीच्या काकाच्या मुलाला बसवून अपहरण (Kidnapping Case) करून नेले.

याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम 364(अ ), 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.