Bhosari Crime News : श्वानाच्या डोक्यात बांबूने मारहाण, इसमाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्यावरून जाणा-या श्वानाच्या डोक्यात बांबू घालून मारहाण केल्याप्रकरणी 30 वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे सोमवारी (दि.04) सकाळी 9.15 वा ही घटना घडली.

अनिल साहेबराव कानडे (वय 30, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शिवम श्रीकांत कोळी (वय 18, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने श्वान रस्त्याने पळत जात असाताना त्याच्या डोक्यात बांबूने मारहाण केली. फिर्यादी डी वाय पाटील महाविद्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.