Bavdhan News : तोंडाला, डोळ्याला मिरची पावडर लावून कोयत्याने केले वार; सीएनजी पंपावरील घटना

एमपीसी न्यूज – तोंडाला, डोळ्याला मिरची पावडर लावून कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे, बावधन येथील सीएनजी पंपावर तरुण कामावर असताना रविवारी (दि.03) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

सुरज गोरख क्षीरसागर (वय 23, रा. विठ्ठल मंदिराजवळ, कोथरूड) असे या हल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे ‌

त्यावरून सुरज उर्फ सोन्या कुडले (वय 30, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यासह मिरची पावडर तोंडाला लावून, कोयत्याने वार करणा-या इसमाविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी काम करत असलेल्या पंपावर जाऊन त्याच्या तोंडाला, डोळ्याला मिरची पावडर लावून कोयत्याने वार केले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.