Wakad Crime News : लग्नाच्या आमिषाने लगट करत महिलेची 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेसोबत शारीरिक लगट करत महिलेच्या नकळत अश्लील व्हिडीओ काढून त्याद्वारे 13 लाखांची फसवणूक केली. ही घटना 30 जून ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत वाकड परिसरात घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने शनिवारी (दि. 15) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9292831842, 9575190027 क्रमांक धारक व्यक्ती अधितांश शिवप्रसाद अग्निहोत्री (रा. बालेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याद्वारे महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यासोबत शारीरिक लगट केली. महिलेच्या नकळत तिचा अश्लील व्हिडीओ काढून तिचा विनयभंग केला. विश्वासघाताने महिलेची 13 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.