Talwade Triveni Nagar : तळवडे त्रिवेणी नगर मार्गावरील उघडे चेंबर देत आहेत अपघाताला निमंत्रण

एमपीसी न्यूज – तळवडे-त्रिवेणी नगर रहदारीच्या (Talwade Triveni Nagar) मार्गावरील चेंबरची लोखंडी झाकणे गायब होत आहेत. त्यामुळे हे उघडे चेंबर अपघाताला निमंत्रणच देत आहेत. सतत वाहनांची आणि माणसांची वर्दळ असणाऱ्या या मार्गावर शाळा, दुकाने, इंडस्ट्री, हॉस्पिटल आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नारिकांपर्यंत सर्वजण या मार्गावरून दररोज जात असतात.

गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील चेंबरची झाकणे गायब होत आहेत. ही झाकणे महापालिका कर्मचारी दुरुस्तीसाठी नेतात की चोरीला जातात हा प्रश्न अजून गुलदस्त्यात आहे? दुरुस्तीसाठी नेली तरी त्याची पर्यायी व्यवस्था करावी किंवा वेळेत ती परत बसवण्यात यावीत.

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणामध्ये बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह अखेर सापडला

परिसरात अपघात होऊ नये यासाठी (Talwade Triveni Nagar) त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय नेत्यांनी व प्रशासनानी वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी रुपी नगर येथील नागरिक राजेश जाधव यांनी एमपीसी न्यूजला दिलेल्या माहितीद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.