Pune News : पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र, आता आपत्ती व्यवस्थान, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता  यांनी पुणे महापालिका आयुक्तांना  सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत.  

आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी आदेश काढून सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश जारी करताना त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सभागृहामध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 आसन क्षमतेचा वापर करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे महानगरपालिकेतील सर्व सभासदांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महानगरपालिकेची मुख्यसभा ऑफलाईन पध्द्तीने घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.

पुणेकरांचे प्रश्न समस्या प्रखरतेने सभागृहात मांडण्यासाठी ऑफलाईन सभा होणे खूप महत्वाचे होते. त्यामुळे याबाबत महापौर यांना सुद्धा विनंती केली होती. यासंबंधीचे महापौर यांचे विनंती पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना पाठवण्यात आले होते. सोमवार (दि.7) सायंकाळी या संबंधी ऑफलाईन मुख्यसभा घेण्याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी (CM) स्वाक्षरी केली असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.