Raje Umaji Naik : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक (Raje Umaji Naik) यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ.बाबासाहेब आंबडेकर चौक, सोमवार पेठ, पुणे येथे करण्यात आल्याची माहिती बिभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे.

राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. 19 व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटीशांविरुद्ध उठावाचे नेतृत्व केले होते. उमाजी नाईक यांनी हा उठाव इतिहासात रामोशींचा उठाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच उमाजी नाईक यांना आद्यक्रांतीकारक असेही म्हणतात.

या सांस्कृतिक कार्यक्रमात राजे उमाजी नाईक (Raje Umaji Naik) यांच्या जीवनकार्यावर आधारित शाहिर श्रीकांत रेणके यांचा पोवाडा सादरीकरण, राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध गाणी यांचे सादरीकरण होईल. सदर कार्यक्रमाची संयोजन आर्यन देसाई यांनी केले असून कार्यक्रमाचे निवेदन सोमनाथ लोहार हे करणार आहेत. कार्यक्रमास आमदार सुनिल कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे तसेच जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Mahaseva Day : आळंदी नगरपरिषदेमध्ये 21 सप्टेंबर रोजी साजरा होणार महासेवा दिन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.