Pimple Saudagar News: तीन महिन्यात साकारणार  BMX पार्क; नाना काटे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर येथील पिके चौक ते यशदा चौक HCMTR मधील जागेत BMX पार्क प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या नियोजित प्रकल्पाची माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक   नाना काटे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तीन महिन्यात काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचे वैशिट्य म्हणजे पार्क 463लांब व 30मीटर रुंद असणार आहे. Bicycle motocross हा प्रकार adventure sports मध्ये मोडतो .Adventure sports खेळणाऱ्या  नवीन खेळाडूसाठी रेसर्स व कमी उंचीच्या जंपसह BMX ट्रॅक नियोजित आहे. BMX बाईक ऑफ रोड रेसिंग साठी असते हा पंप ट्रॅक लाल माती, डांबर अथवा बिटूमेनपासून बनवली जातो. एका ट्रॅक मुळे एका वेळी जास्तीत जास्त 8खेळाडू हा ट्रॅक वापरू शकतात. ट्रॅक मध्ये सुरवातीच्या पॉइंट पासून समाप्त लाइन पर्यंत विविध जंप आणि रोलर्स असतात. या पार्क मध्ये पीके चौकातून प्रवेश असेल तसेच यामध्ये पालकांसाठी बैठक व्यवस्था असेल. तसेच रेसिंग ट्रॅक साठी व्ह्यूइंग् गॅलरी ,कॅफेटेरिया,सेल्फी पॉईंट व पार्किंग व्यवस्था असणार आहे.  रनिंग ,स्केटिंग ट्रॅक असेल.

या खेळा संबंधी माहिती व शिकविण्यासाठी ट्रेनर असेल. अशा या नाविन्यापूर्ण व सोयी सुविधा युक्त प्रकल्पाची पाहणी नगरसेवक नाना काटे यांनी केली. स्मार्ट सिटी जनरल मॅनेजर अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया आर्कीटेक्ट श्रुती शहा, शिर्के  कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विजय बांदल ,तानाजी चव्हाण,अनिकेत धायगुडे  आदी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.