Pimpri : नवीन वर्षाची सुरुवात ‘दारु नव्हे दूध’ पिऊन करा- अण्णा जोगदंड

एमपीसी न्यूज – नवीन वर्षाची सुरुवात दारू नव्हे तर दूध’ पिऊन करा. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. भारतीय सण साजरे करा. आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले तरी देखील आपण त्यांच्याच संस्कृतीचे अनुकरण करत आलो आहोत. नवीन वर्षाची सुरुवात व शेवट आई-वडिलांच्या आशीर्वादाने करा, गुरुजनांच्या पदस्पर्शाने करा, असे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केले.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राजमाता जिजाऊ उद्यान व कृष्णा चौक येथे नागरिकांना दूध वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सहसचिव गजानन धाराशिवकर,पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, युवक अध्यक्ष अतिश गायकवाड, युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, सामाजिक कार्यकर्ते राजु सावळे, वनसकर पंडित, सागर बेल्हेकर, प्रकाश बंडेवार, सुदाम जोगदंड, नितीन जोगदंड, संपदा ईतापे, माधुरी जाधव, कवी शरद शेजवळ, आदित्य गटणे, ओंकार देशमुख, सचिन नेमाडे, गोपीनाथ कस्तुरे, राहूल शेंडगे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी स्पीकरद्धारे दारू ऐवजी दूध पिण्याचे आवाहन केले. स्लोगनद्धारे कार्यकर्त्यांनी जनजागृती केली. सर्व उपस्थित नागरिकांना दारू न पिण्याची शपथ अण्णा जोगदंड यांनी दिली. महीलांच्या हस्ते तरुणांना दूध वाटप करण्यात आले.

यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, “तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे. अल्कोहोलमूळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. जगात अल्कोहोल घेण्याचे प्रमाण 39 टक्के, भारतात 36 टक्के, महाराष्ट्रात 41 टक्के आहे. दररोज पिण्याऱ्याचे प्रमाण 30 टक्के तर कधीतरी पिण्याऱ्याचे प्रमाण 11 टक्के आहेे .हे प्रमाण कमी व्हावे संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

अध्यक्ष विकास कुचेकर म्हणले, गेल्या दहा वर्षापासून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचे काम करत आहोत. ब्रिटिश कालीन विचारांची व नियमांची होळी करून भारतीय संस्कृतीचे अनुकरण करण्याचे आवाहन देखील कुचेकर यांनी केले.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार म्हणाले, मराठी बांधवाचे मराठी वर्ष गुढीपाडव्या पासून सरु होते. मराठमोळे सण साजरे करा. मराठी संस्कृती जपा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.