Pimpri Corona Update : शहरात नवीन 44 रुग्णांची नोंद, 40 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 44 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 517 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 78 हजार 83 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 337 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 138 रुग्ण गृहविलगीकरणात असून 199 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 27 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 253 आहेत. आज दिवसभरात 13 हजार 237 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 28 लाख 9 हजार 646 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.