Pimpri Corona Update : शहरात आज केवळ 4 नवीन रुग्णांची नोंद, 14 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील केवळ 4 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 119 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली.

सध्या 66 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 54 रुग्ण गृहविलगीकरणात असून 12 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 6 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 294 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 897 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 81 हजार 682 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.