Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 2 हजार 277 रुग्णांची नोंद, 816 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 277 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 816 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 92 हजार 261 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 10 हजार 947 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 10 हजार 607 रुग्ण गृहविलगीकरणात असून 340 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 101 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 496 आहेत. आज दिवसभरात 1 हजार 231 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 30 हजार 137 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.