Pimpri Corona Update: आज 33 जणांना कोरोनाची लागण तर 56 जण कोरोनामुक्त

Pimpri Corona Update: Today 33 people are infected with corona and 56 people are free from corona शहरात सध्या 469 सक्रिय रुग्ण आहेत. तर 673 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि.14) 33 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 18 पुरुष आणि 15 स्त्रियांचा समावेश आहे. तर 56 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 1 हजार 181 झाला आहे.

रविवारी चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण बौध्दनगर, चिंचवड, गणेशनगर थेरगाव, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, भाटनगर, अजंठानगर, आनंदनगर चिंचवड, सिध्दार्थनगर दापोडी, पाटीलनगर चिखली, केशवनगर चिंचवड, एश्वर्यमनगर चिखली, तानाजीनगर चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत.

तर नाणेकर चाळ पिंपरी, जयमालानगर सांगवी, आनंदनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, गुलाबनगर दापोडी, भोसरी, जय भीमनगर दापोडी, साईबाबनगर चिंचवड, लिंकरोड पिंपरी, गुरुनानक कॉलनी कासारवाडी येथील रहिवासी असलेल्या 56 कोविड-19 बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

रविवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात नाणेकरचाळ पिंपरी येथील 40 वर्षीय महिलेचा आणि अजंठानगर आकुर्डी येथील 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरातील 21 रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.

शहरात सध्या 469 सक्रिय रुग्ण आहेत. तर 673 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील रहिवासी असलेले 29 रुग्ण सध्या शहरातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर बाहेरील 91 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहराच्या बाहेरील 19 रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.

आज 376 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 962 संशयित रुग्ण आज शहरातील रुग्णालयात दाखल झाले. आज आलेल्या चाचणी अहवालात 864 अहवाल निगेटिव्ह आले. सध्या 352 अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.