Pimpri Corona Update: शहरात आज 136 नवीन रुग्णांची नोंद, 103 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 136 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 440 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 73 हजार 992 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 857 सक्रिय रुग्ण शहरात असून त्यातील 459 रुग्ण गृहविलगीकरणात असून 398 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 41 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 414 आहेत. आज दिवसभरात 18 हजार 48 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 19 लाख 68 हजार 118 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.