Pimpri : कोल्हापूर येथे नेण्यासाठी दिलेल्या आठ लाखांच्या स्क्रॅप मटेरियलचा अपहार; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एमआयडीसी पिंपरी येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीने पुण्यातून कोल्हापूर येथे स्क्रॅप मटेरियल नेण्यासाठी ते एका ट्रकमध्ये भरून दिले. ट्रक चालकाने कोल्हापूर येथे मटेरियल न नेता त्याचा अपहार करून ट्रक वाघोली येथे सोडून दिला. हा प्रकार गुरुवारी (दि. 17) रात्री नऊ ते शुक्रवारी (दि. 18) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडला.

भारत शिवसिंग राजपूत (वय 51, रा. च-होली खुर्द) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश सीताराम बंडगर (वय 47, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिंटू ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर पदावर काम करतात. त्यांच्या ट्रान्सपोर्टवर आरोपी सुरेश बंडगर हा चालक म्हणून काम करतो. त्याच्यावर विश्वास ठेऊन 17 हजार 730 किलो वजनाचे आठ लाख 15 हजार 580 रुपये किमतीचे स्क्रॅप मटेरियल माल भरून दिला. तो माल कोल्हापूर येथे पोहोच करण्यासाठी पाठवला होता. मात्र बंडगर याने कोल्हापूर येथे माल पोहोच न करता ट्रक वाघोली येथे सोडून त्यातील मालाचा अपहार केला. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.