Pimpri News: …असे आहे नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालय; आज होणार लोकार्पण

अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील 816 खाटांचे स्वतंत्र कोविड- 19 रुग्णालय आहे. 616 ऑक्सिजन युक्त खाटा व 200 आयसीयू खाटांची सुविधा आहे.

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पीएमआरडीएच्या वतीने नेहरुनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (दि.26) सायंकाळी या कोविड सेंटरचे ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.

अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील 816 खाटांचे स्वतंत्र कोविड- 19 रुग्णालय आहे. 616 ऑक्सिजन युक्त खाटा व 200 आयसीयू खाटांची सुविधा आहे.

रुग्णालयामध्ये कोविड – 19 संबंधी अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. 3900 चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित केले आहे. रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ 11 हजार 800 चौरस मीटर इतके आहे. 20 हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात येत असून या साठी 4 हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे.

25 हजार लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत. रुग्णालयाचे काम 6 ऑगस्ट 2020 रोजी चालू झाले. आजच्या तारखेला 200 आयसीयू खाटा व 616 खाटा यांचे काम पूर्ण व टेस्टिंग चालू आहे . हे आयसीयू महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे.

हे रुग्णालय उभारण्याचा व 6 महिने चालवण्याचा अंदाज खर्च 85 कोटी इतका अपेक्षित आहे. अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा) इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च 50 टक्के राज्य शासन व 50 टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.