Chinchwad News: पुन्हा दोन दिवसात कोरोना बाधित पोलिसांची संख्या दुप्पट; 65 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. अवघ्या दोन दिवसात पोलीस दलातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा दुप्पट झाली आहे. 8 जानेवारी रोजी 14 असलेली संख्या 10 जानेवारी रोजी 30 तर 12 जानेवारी रोजी 65 एवढी झाली आहे.

पहिल्या लाटेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोरोनाला दूर ठेवले, मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा शहर पोलीस दलात कहर झाला. 345 अधिकारी आणि 2930 कर्मचारी असे एकूण तीन हजार 375 एवढे पिंपरी चिंचवड पोलिसांचे मनुष्यबळ आहे. त्यातील तब्बल 28 टक्के पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला.

15 मे 2020 रोजी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला. एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा 997 जणांना कोरोनाची लागण झाली. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील 65 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचा-यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 17 अधिकारी आणि 43 कर्मचारी गृहविलगीकरणात आहेत. आत्तापर्यंत पोलीस दलातील एकूण 118 अधिकारी आणि 740 कर्मचारी यांना करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत शहर पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.