Pimpri : चोरी करत असताना पाहिले म्हणून सुरक्षा रक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज – चोरी करत असताना पाहिले म्हणून तिघांनी एका (Pimpri) सुरक्षारक्षकाला हाताने व लोखंडी तलवारीने मारहाण केली आहे ही घटना रविवारी रात्री पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी सुखदेव राजेंद्र मोरे (वय 45 रा पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे. यावरून पोलिसांनी उज्वल विनोद लव्हे (वय.21 रा पिंपरी) याला अटक केली असून, त्याचे साथीदार गौरव वाल्मिकी व राज वाल्मिकी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वल व गौरव याला पिंपरी पुलाखालून स्टील चोरी करताना फिर्यादी यांनी पाहिले होते. यादरम्यान फिर्यादी यांच्या घरासमोर शाहरुख शेख व आश्रम शेख हे दोन भावांमध्ये भांडण सुरू होते.

यावेळी भांडण सोडवत असताना उज्वल व गौरव तेथे आले व त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत जुनी भांडणे काढली यात आरोपींनी फिर्यादीला त्या भुकेने मारहाण करत तलवार हातावर मारून हाताचे हाड फ्रॅक्चर केले.

Pimpri : सिमेंटच्या जंगलात नंदीबैल मालकाचे अस्तित्व धोक्यात

तसेच तुला बघून घेतो अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.