Pimpri : पान टपरी चालकास मारहाण करून केले गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : तीन जणांनी पिंपरीमध्ये (Pimpri) पान टपरी चालकास गंभीर जखमी व मारहाण करून चोरी केल्याची घटना घडली. याबाबत अरविंदकुमार सिंह (वय 21 वर्षे, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

कुंदन गायकवाड (वय 22 वर्षे, मोरवाडी, पिंपरी) हा आरोपी जखमी असूनही वाय सी एम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याचे दोन साथीदार पण आरोपी आहेत.

फिर्यादी हे त्यांची नाना नानी पार्क, कापसे उद्यान, मोरवाडी, पिंपरी येथील पान टपरी बंद करत असताना त्यांच्या ओळखीचा आरोपी कुंदन गायकवाड याने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली असता फिर्यादीने पैसे दिले नाही.

Bhosri : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

या कारणावरून त्याने फिर्यादीच्या डोक्यात (Pimpri) सिमेंटच्या गट्टूने मारले व गाडीवर आलेल्या दोन साथीदार यांनी हाताने मारहाण केली. गायकवाड यांनी पान टपरीच्या ड्रॉवरमधून 700 रुपये घेऊन गेला. आरोपींच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 394, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.