Pimpri : पीएमपीची दुरावस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ (एमपीएल) बस गाड्यांमधून दररोज प्रवास करणारा प्रवासी वर्ग मोठा आहे. (Pimpri) मात्र सध्या शहरातील अनेक पीएमपीएमएलच्या बसेसची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे.  अनेक बसमधील काचेचे दरवाजे, समोरील काचांना तडे गेल्याचे  एमपीसी न्यूज ने पाहणी केल्यास निदर्शनास आले.

पुणे शहरात पीएमपीएल बससेवा पुणेकरांची जीवन वाहिनी बनली आहे. या पीएमपीएलच्या बस गाड्यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामध्ये नोकरदारांची संख्या जास्त आहे. तिकिटाचे दरही पाच रुपयांपासून असल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवास करण्यास नागरिक प्राधान्य देतात.

पाहणी करत असताना पीएमपीएल च्या बस गाड्यांचे काचेचे दरवाजे बंद , नाददुरुस्त अवस्थेत आहेत. अनेकवेळा नागरिकांना एकाच दरवाजातून बाहेर पडावे लागते. (Pimpri) त्यामुळे दरवाजातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडते अनेकवेळा धक्काबूक्की होते.  गडबडीत बाहेर पडताना दुखापत होते. बस गाड्यांमधील समोरील काचा तुटलेल्या असल्याचे दिसले. त्यामुळे वाहन चालकाच्या , प्रवाशांचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Covid 19 : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर 10-11 एप्रिलला देशभरात मॉक ड्रील

पीएमपीएलच्या बस गाड्यांमध्ये काम करणारे बसचालक मोबाईलवर बोलतांना बस चालवताना दिसतात, त्यामध्ये काहीजण हेडफोन लावून बस चालवतात, तर काही बस चालक तंबाखू गुटखा पदार्थाची सेवन करताना दिसतात. अशा वाहन चालकांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे. (Pimpri) तसेच प्रशासनाने नाद दुरुस्त अवस्थेतील पीएमपीएलच्या बसगाड्यांवर लक्ष देण्याची गरज आहे.

 

बसमधील समस्या

* पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी असल्यामुळे राज्यभरातून नागरिक नोकरी निमित्त या ठिकाणी येतात. त्यामध्ये पीएमपीएलने प्रवास करताना गाड्यांमध्ये आयवीआर नसल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होते.

* एलईडी स्किन बंद असल्यामुळे शहरात  नोकरी निमित्ताने आलेल्या नागरिकांचे हाल होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.