Pune Corona Updates : शहरात नवीन 4 हजार 136 कोरोना रुग्णांची नोंद; 7140 जणांना डिस्चार्ज

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 4 हजार 136 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 7 हजार 140 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोनामुळे शहरातील पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 214 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 24 हजार 684 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 41 हजार 173 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 136 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 12 हजार 816 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 42 लाख 93 हजार 630 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढता – उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे मोहोळ यांनी ट्विटद्वारे सांगितले. महापौर मोहोळ लवकर बरे व्हावे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्षनेते अतुल भातखळकर यांनी ट्वीटद्वारे सदिच्छा दिल्या आह

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.