Pune Corona Update: पुण्यात 67 नवीन रुग्णांची नोंद तर 93 जणांना डिसचार्ज

एमपीसी न्यूज: – पुणे शहराच्या विविध भागातील 67 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 93 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आज शहरात एकही मृत्यूची नोंद नाही तर महापालिका हद्दीबाहेरील 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत शहरातील 9 हजार 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 4 हजार 397 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 660 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. या सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आज 4302 जणांची टेस्ट करण्यात आली त्यातील 67 जणांची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.