Pune Crime : पुण्यात पोलिसांच्या दोन कारवायांमध्ये पावणे दोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या (Pune Crime) अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये 22 हजारांचा गांजा तर दीड लाखांचे एम.डी. (मेफेड्रोन) असे अमली पदार्थ जप्त केले असून दोन जणांना अटक केली आहे.

पहिल्या कारवाईमध्ये बुधवारी (दि.21) कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना कोंढवा येथील सोमजी चौकाजवळ पीएमटी बस स्टॉप जवळ एक इसम हा गांजा घेऊन उभारल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचून इस्माईल दावलसो बडेघर (वय 48 रा.कोंढवा) याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 22 हजार 560 रुपयांचा 1 किलो 128 ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. यावरून त्याला अटक करत त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

MPC News Podcast 23 September 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

तर दुसऱ्या कारवाईमध्ये (Pune Crime) बिबेवाडी पोलीस ठाणे क्षेत्रात कोंढवा जवळील काकडे वस्तीजवळ एकजण एम.डी. या अंमली पदार्थाच्या विक्री साठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी चारचाकी गाडीतून आलेल्या आकाश देवराम पांडियन (वय 24 रा.कोंढवा) याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे तपासमी केली असता त्याच्याकडो 1 लाख 57 हजार 200 रुपयाचे 10 ग्रॅम 480 मिलीग्रॅम एम.डी. पदार्थ, मोबाईल, महागडी दुचाकी, 2 हजार रुपये रोख, 4 लाखांची स्कोडा कार व एक इलेक्ट्रीक वजन काटा असा एकूण 6 लाख 45 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला अटक करत बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.