Pune : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून महापालिकेने केला एक कोटीचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता करणाऱ्यांकडून पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरात एक काेटी रुपयाहून अधिक दंड वसूल केला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी बुधवारी दिली.

नवीन नियमानुसार तिसऱ्यावेळी संबंधित संस्था, व्यक्ती यांच्याकडून दुप्पट दंड वसूल करण्यात येणार आहे. पुणे महापािलकेने स्वच्छता नियमावली केली हाेती. या नियमावलीत दंडाची तरतूद केली गेली हाेती. ही नियमावली अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविली हाेती. मात्र, या नियमावलीला अद्याप मंजुरी मिळाली नाही. राज्य सरकारने या नियमावलीच्या आधारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकरीता एक नियमावली लागू केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या नियमावलीच्या आधारे आता दंड वसूल केला जात आहे. उघड्यावर कचरा टाकण्यासंदर्भात घरगूती, निवासी मिळकती असणाऱ्यांकडून पाहिल्यावेळी पाचशे रुपये, दुसऱ्यावेळी ७५० रुपये व तिसऱ्यावेळीपासून पुढे प्रत्येकवेळी एक हजार रुपये दंड वसुल केला जाणार आहे. त्याचप्रकारे बिगर निवासी मिळकती आणि संस्थांनी या नियमाचा भंग केला तर, त्यांच्याकडून प्रत्येकवेळी अनुक्रमे एक हजार, दीड हजार व दाेन हजार रुपये दंड वसूल केला जाईल.

कारखाने आणि उद्याेगांकडून नियम भंग झाल्यास त्यांच्याकडून दाेन हजार रुपये, तीन हजार रुपये आणि चार हजार रुपये दंड वसुल केला जाणार अाहे. रस्त्यावर घाण करणाऱ्यांकडून प्रत्येकी १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे (१५० रुपये), रस्त्यावर लघुशंका करणे (२०० रुपये), उघड्यावर शाैच करणे (५०० रुपये), सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांकडून हाेणारी अस्वच्छतेसाठी संबंधित मालकाकडून १८० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.