Alandi : पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने केला साडेसात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणा-याने जमा झालेल्या 7 लाख 43 हजार 977 रुपयांचा अपहार केला. ही घटना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत केळगाव हनुमानवाडी आळंदी येथे घडली.

दिनेश कान्हू कड (वय 44, रा. खराबवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनायक नारायण वाघमारे (रा. चिंबळीफाटा, पुणे. मूळ रा. कुंबेफळ, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश यांचा आळंदी जवळ केळगाव हनुमानवाडी येथे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर आरोपी विनायक व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ या कालावधीत जमा झालेली 7 लाख 43 हजार 977 रुपयांची रोकड दिनेश यांच्याकडे तसेच बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन तिचा अपहार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.