Pune News : ओएलएक्स जहिरातीमधील वस्तू खरेदी करतो असे सांगून 2.76 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्स वरती दिलेल्या जहिरातीमधील वस्तू खरेदी करतो असे सांगून एकाची 2.76 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ परिसरात ऑनलाईन पद्धतीने हा प्रकार घडला.

या प्रकरणी वासव राठोड (वय 24, रा. ए ब्लॉक, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एसी व बेड विकण्यासाठी ओएलएक्स वरती जाहिरात दिली होती. आरोपी यांनी ती जहिरात पाहून आम्ही एसी व बेड खरेदी करतो असे सागितले व क्यू आर कोड पाठवून फिर्यादी यांची 2 लाख 76 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.