Pune News: गडबड केली असती तर जशास तसे उत्तर दिलं असतं; गिरीश बापट यांचं काँग्रेसला प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसने देशात कोरूना पसरवला असे सांगून महाराष्ट्र काँग्रेसचा अपमान केल्याचे सांगत पुणे शहर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज खासदार गिरीश बापट यांच्या घराजवळ आंदोलन केले. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली होती. खासदार गिरीश बापट यांनी मात्र या आंदोलनाची प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गडबड केली असती तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं असे सांगितले..

गिरीश बापट म्हणाले, काँग्रेसचे काही कार्यकर्ते आज घराबाहेर आंदोलन करण्यासाठी आले होते. लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे.. मात्र ते आंदोलन सनदशीर मार्गाने झाले पाहिजे. माझ्या घरासमोर आंदोलन होणार हे माहित झाल्यानंतर भाजपचे चारशे ते पाचशे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जमा झाले होते. परंतु मी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं होतं. कारण त्यांचे महत्त्व वाढले असते. त्यामुळे आम्ही शांत होतो. परंतु दुर्दैवाने काही गडबड झाली असती तर आम्ही देखील काँग्रेसला जशास तसे प्रत्युत्तर दिलं असतं.

गिरीश बापट म्हणाले, नरेंद्र मोदी कोणाचीही माफी मागणार नाहीत. मोदींनी मुंबईचे जे उदाहरण दिले ते अगदी खरे आहे. केंद्र सरकारने कोरोना काळात सर्व कामगारांची काळजी घेतली होती. परंतु काँग्रेसने सर्व नियम तोडून कामगारांना रेल्वे स्टेशनवर बोलावले.. त्यामुळे नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. उलट कोरोना काळात सरकारला सहकार्य केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागायला हवी असे देखील बापट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.