Pune news: लग्नाच्या आमिषाने पोलिसाकडून वकील महिलेवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज: एका पोलिस कर्मचाऱ्याने वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. एका 32 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून चतुशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण गंगाधर राऊत (३३) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात तो कार्यरत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एका संकेतस्थळावरून या दोघांची ओळख झाली होती. फिर्यादी महिला या वकील आहेत. त्यांनी लग्न करणाऱ्या एका संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तर लक्ष्मण याने देखील येथे नोंदणी केली होती. त्यातून त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी त्याने तक्रारदार यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच, त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र त्यानंतर लग्न न करता त्यांची फसवणूक केली आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. अधिक तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.