Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी

एमपीसी न्यूज : घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5,915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आज 5 जानेवारी सुरु होणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात (Pune News) या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुणे मंडळाच्या 5,915 घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

गेल्या वर्षभरात म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे आणि औरंगबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची नागरिकांना प्रतीक्षा होती. सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरु होतं आणि तेच कारण पुढे करत म्हाडाने अचानक सोडत रद्द केली होती.  म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल केल्याने आणि या अनुषंगाने नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत असल्याने सर्वच मंडळाची सोडत रखडली होती. मात्र आता नवीन संगणकीय प्रणालीची चाचणी यशस्वी झाली असून नवीन प्रक्रियेला मंजूर मिळाल्याने गुरुवारपासून एकच नोंदणी सेवा सुरू होत आहे. तर पुणे मंडळाच्या सोडतीलाही सुरुवात होत आहे.

Pune News : यंदा लोहगडावर होणाऱ्या उरुसाला परवानगी नाही, लोहगड किल्ला परिसरात कलम 144 लागू

म्हाडाच्या  घरांची सोडत आणि ताबा प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत यापुढे हस्तक्षेप होणार नाही. म्हाडाच्या घरांची व्रिक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे.

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. म्हाडाच्या राज्यभरातील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया हाताळली जाणार आहे.

पुणे मंडळाच्या 5,915 घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या सदनिकांची सोडत 17 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.