Pune News : आपल्या परिसरात राडारोडा आढळल्यास संपर्क साधा, पुणे पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना परिसरात राडारोडा आढल्यास पालिकेला संपर्क करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेच्या वतीने एक टोल फ्रि नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिक्च्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘नागरिकांसाठी जाहीर आवाहन!! नागरिकांनी आपल्या परिसरात कोठेही राडारोडा आढळल्यास खालील टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा.’ 18002339595 असे ट्विट पालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.