Pune News : पुण्यात शनिवारपासून ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा ‘

एमपीसी न्यूज – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा’ आयोजित करण्यात आला आहे. विचारांचे आदान-प्रदान होण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय, सर्व कार्यकर्त्यांसाठी हा कट्टा खुला असणार आहे. रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.

अण्णा इडली हॉटेल, मार्केट यार्ड येथे शनिवारी (दि.11) सकाळी 10 वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन पार पडेल. अशी माहिती लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर, उपक्रमाचे समन्वयक डॉ. दीपक बीडकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

उद्घाटन कार्यक्रमाला पुण्यातील राजकीय नेते आणि कट्टा संस्कृतीतील अग्रणी काँग्रेस नेते आणि वाडेश्वर कट्टा प्रणेते डॉ. सतीश देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते, वाडेश्वर कट्टा प्रणेते अंकुश काकडे, मनसे नेते, वैशाली कट्टा, पुणे कट्टा प्रणेते अॅड.गणेश सातपुते उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.