Pimpri Corona Update : गुरुवारी शहरात 54 नवीन रुग्ण; 63 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी, दि. 9) दिवसभरात 54 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 77 हजार 879 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 73 हजार 771 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 326 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 133 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 193 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 2 हजार 390 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजवर शहरातील 27 लाख 27 हजार 471 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.