Pune News: कंटेनरच्या धडकेत दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार; चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील कडाचीवाडीतील घटना

एमपीसी न्यूज: भरधाव कंटेनर व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी ( ता. खेड, जि.पुणे ) येथे शुक्रवारी ( दि. 18 फेब्रुवारी ) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.    

तन्मय पंकज हरगुडे ( वय 18 वर्षे, रा. साबळेवाडी,ता.खेड ) व ओंकार कैलास साबळे ( वय 18, रा. बहुळ, ता. खेड ) अशी अपघातात ठार झालेल्या यावकांची नावे आहेत.  राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु हे महाविद्यालय सुटल्यानंतर तन्मय आणि ओंकार हे दोघेजण शुकवारी दुपारी 2 च्या सुमारास घरी निघाले होते. चाकण शिक्रापूर रस्त्याने आपल्या ताब्यातील दुचाकीवरून ( क्र. एम एच 12 क्यू एच 1717 ) जात असताना कडाचीवाडी येथे पुढे जाणाऱ्या भरधाव कंटेनरला दुचाकीची धडक बसली.  यामध्ये तन्मय आणि ओंकार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चाकण पोलिसांत या बाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.