Pune Unlock Guidelines : पुणेकरांना दिलासा! कोरोना निर्बंधांमध्ये सूट; काय आहे नियमावली?

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना आणि ओमायक्राॅनची लाट ओसरली असून पुण्यातील रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. कोरोना संकट कमी झाल्याने पुणे प्रशासनाने पुन्हा एकदा नवी नियमावली जाहीर केली आहे, ज्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अर्ध्या क्षमतेने सुरू असणारी यंत्रणा पुन्हा पुर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटगृहे, हाॅटेल, सार्वजनिक वाहतूक यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. 

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत पुणेकरांना सुखावणारी बातमी दिली आहे. यामध्ये ‘पुणे शहरातील निर्बंध आणखी शिथिल’ असे म्हणत कोणत्या गोष्टीत नागरिकांना दिलासा मिळणार हे  त्यांनी सांगितले आहे. पुणे आयुक्त विक्रम कुमार यांनी ही सदर नियमावली जारी केली आहे.

साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीत ‘हे’ निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

  • सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केवळ 50 टक्के उपस्थितीस परवानगी.
  • लग्न सोहळा, अंत्यविधी, दशक्रिया विधीस सुद्धा 50 टक्के लोक उपस्थित राहू शकतील.
  •  1000 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा असल्यास DDMA यांची पूर्व परवानगी आवश्यक.
  • दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा, प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, वसतीगृहे, अंगणवाडी संपूर्ण क्षमतेने चालू राहतील.
  • घरपोच सेवा पुरविणाऱ्या सर्व आस्थापना पूर्ण क्षमतेने कोविड पूर्व नियोजित वेळेनुसार सुरू राहतील.
  • सर्व शाॅपिंग माॅल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार, स्पोर्ट्स काॅम्लेक्स, जीम, स्पा, स्वीमिंग पूल, धार्मिक स्थळे, मनोरंजन स्थळे 100 ट्क्के क्षमतेने सुरू राहतील.
  • शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय, औद्योगिक व वैद्यानिक संस्थांना 100 टक्के क्षमतेने सुरू राहण्यास मुभा.
  • सर्व आस्थापनातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक असून Covid Appropriate Behaviour चे पालन करणे आवश्यक आहे.
  • सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना सुद्धा लागू राहतील असे या नियमावलीत नमुद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.