Weather Alert : पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – पूर्व मध्य अरबी समुद्रापासून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पुणे आणि आसपासच्या परिसरात मंगळवारपर्यंत (दि.23) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

मागील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण गोव्यात काही ठिकाणी तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात महाबळेश्वर मध्ये सर्वात कमी (17.0 अंश से) तापमान नोंदवले आहे.

पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अजून दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, तद्नंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.