Pune: राजकारणातून बाजूला जाईन तेव्हा निश्चितच सीमेवर देशाचे रक्षण करणार- चंद्रकांत पाटील

Pune: When I step aside from politics, I will protect the country on the border - Chandrakant Patil मला जेव्हा विचारले जाते की, तुमचे कोणते स्वप्न अपूर्ण राहिले आहे का ? तेव्हा मी सांगतो की मला लष्करात सेवेची संधी मिळावी ही इच्छा अपूर्ण आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.

एमपीसी न्यूज- जेव्हा मी राजकारणातून बाजूला जाईन, तेव्हा निश्चितच सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मिळेल ते सेवाकार्य करेन, असा संकल्प भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

बुधवारी शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादाप्रमाणे भाजप प्रभाग १३ च्यावतीने चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शहीद मेजर ताथवडे यांचे शौर्य अतुलनीय आहे. मला जेव्हा विचारले जाते की, तुमचे कोणते स्वप्न अपूर्ण राहिले आहे का ? तेव्हा मी सांगतो की मला लष्करात सेवेची संधी मिळावी ही इच्छा अपूर्ण आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.

यावेळी उपस्थितांनी प्रदीप ताथवडे व लडाख सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रदीप ताथवडे यांची पुतणी प्रांजल ताथवडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांना चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

यावेळी शहीद प्रदीप ताथवडे यांचे वडील रामचंद्र ताथवडे, बंधु मिलिंद, वहिनी वनिता, पुतणी प्रांजल, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुध्दे, स्वीकृत सदस्या मिताली सावळेकर, भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, कुलदीप सावळेकर, मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण उपस्थित होते.

प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, रामदास गावडे, विठ्ठल मानकर, सुनील होलबोले, अनुराधा येडके, अमोल डांगे, सौरभ अथनीकर, हेमंत भावे, समीर ताडे, वैभव जमदाडे, नीलेश गरूडकर, हेमंत बोरकर, संगीता शेवडे, नेहल शहा, श्रीपाद गोहाड आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.