Rahatani: कंपनीतील वरिष्ठांच्या छळाला कंटाळून कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – कंपनीतील वरिष्ठांच्या छळाला कंटाळून (Rahatani)कर्मचाऱ्यांनी गळफास घेतात म्हणते केली आहे याप्रकरणी चार जनाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार 11 मार्च 2023रोजी नखाते वस्ती रहाटणी येथे घडला आहे.
प्रदीप अशोक देवताळे (वय 38 रा. नखाते नगर,रहाटणी)असे (Rahatani)मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर या प्रकरणी अल्लुरी, अमन, किरण कापुरे व अनिकेत देशमुख या चार जनाविरुद्ध आत्महत्या प्रवृत्ती केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप देवताळे हे फ्रेश आट होम या कंपनीमध्ये मागील दीड वर्षापासून नोकरी करत होते. यावेळी कंपनीत असणारे वरिष्ठ अल्लुरी अमन किरण कापुरे व अनिकेत देशमुख या दोघांनी सतत प्रदीप यांना टार्गेट करत त्यांचा मानसिक छळ केला त्यांच्या या छळाला कंटाळून प्रदीप यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये नखाते वस्ती येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी स्वतः पोलिसांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.