Alandi News : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती,आळंदीच्या विश्वस्तांची ऑगस्टची मासिक सभा संस्थानच्या पुणे कार्यालयात पाच ऑगस्ट रोजी झाली. या सभेत सन 2022- 23 या वर्षाकरिता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

योगेश देसाई हे पुण्यातील प्रतिष्ठित व्यावसायिक असून देसाई बंधू आंबेवाले या पेढीचे मालक आहेत. त्यांनी यापूर्वी सन 2021–22 या वर्षीही प्रमुख विश्वस्तपदाची तसेच दोन वेळा श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढ वारी आळंदी- पंढरपूर पालखी सोहळ्यात पालखी सोहळा प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळली आहे.

यावेळी विश्वस्त अभय टिळक,लक्ष्मीकांत देशमुख, अ‍ॅड.विकास ढगे पाटील आणि योगेश देसाई हे उपस्थित होते. याबाबत माहिती श्री ज्ञानेश्वर संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.