India Corona Update : मागील 24 तासांत वीस हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज : देशात मागील 24 तासांत वीस हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 18 हजार 732 नवे रुग्ण तर, 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 01 लाख 87 हजार 850 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 21 हजार 430 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत देशात 97 लाख 61 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजघडीला देशात 2 लाख 78 हजार 690 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मागील 24 तासांत 279 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.81 टक्के एवढं आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 81 लाख 02 हजार 657 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 43 हजार 368 नमूने शनिवारी (दि.26) तपासण्यात आले आहेत.

मागील 24 तासांत देशभरात झालेल्या चाचण्यांच्या तूलनेत नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या निरंतर कमी होताना दिसत आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.