India Corona Update : चोवीस तासांत 3,116 कोरोना रुग्णांची नोंद, 5,559 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 3 हजार 116 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 5 हजार 559 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.71 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 90 हजार 991 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 37 हजार 072 रूग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला 38,069 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 15 हजार 850 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.85 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 7.61 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 180 कोटी 13 लाख 23 हजार 547 जणांना लस टोचण्यात आली आहे. चोवीस तासांत 20.31 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.