Crime News : चाकण येथे रिक्षाचालकांनी प्रवाश्यांना लुटले

एमपीसी न्यूज – दोन तरूणांना रिक्षाचालकांनी दमदाटी करत लुटले आहे.हा प्रकार चाकण येथे शुक्रवारी (दि.9) सकाळी सात वाजता घडला.

याप्रकरणी संतोष कमलु बघेल (वय 22 रा.छत्तीसगड) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एमएच 12 जेएस 6106 (नाव पत्ता माहिती नाही) या रिक्षाचा चालक व त्याचा साथीदार अंदाजे 35 वयाचा दुसरा रिक्षा चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून व्यावसायिकाला केले जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अरूण लोनसिंह ध्रुव यांच्याकडून आरोपींनी दमदाटी करून त्यांच्याकडील सात हजार रुपये जबरदस्ती काढून घेतले.चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.