Pimpri Crime News : प्लायवूडचे दुकान फोडून रोख रकमेसह देवांच्या मूर्ती चोरीला

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी प्लायवूडचे दुकान फोडून दुकानातून 70 हजारांची रोकड आणि देवांच्या दोन मूर्ती चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी लिंकरोड, पिंपरी येथे उघडकीस आली.

किशोर मुलचंद नागदेव (वय 41, रा. वैभवनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागदेव यांचे भाटनगर लिंकरोड पिंपरी येथे सुरेश प्लायवूड अँड हार्डवेअर नावाचे दुकान आहे. त्यांनी सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला.

दुकानातून 70 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 28 हजार 500 रुपये किमतीच्या अर्धा किलो चांदीच्या देवाच्या दोन मूर्ती असा एकूण 98 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी पहाटे फिर्यादी यांच्या मावस भाऊ मुकेश फेरवानी यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. मुकेश फेरवानी यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना फोनवरून घटनेची माहिती दिली.

फिर्यादी यांच्या दुकानाच्या समोरील बाजूस रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. पिंपरी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.