Rotary Club : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने जवानांसह अनोखे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Rotary Club) सिटी यांच्या वतीने रक्षाबंधना निमित्त स्माईल व्यसनमुक्ती केंद्र उर्से व सीआरपीएफ 242 बटालियन या जवानांचा राखी बांधत अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला आहे. हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल या ठिकाणी उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमास स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक हर्षल पंडित, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो दीपक फल्ले, रो विलास काळोखे, रो दिलीप पारेख, रो संजय मेहता, रो सुरेश शेंडे,रो किरण ओसवाल, सावरकर गुरुकुलचे अध्यक्ष रो सुरेश दाभाडे, रो प्रदीप टेकवडे, रो संतोष लोणकर, रो प्रशांत ताय, रो तानाजी मराठे, रो संजय वाघमारे, रो प्रदीप मुंगसे व डॉ. रघुनाथ कश्यप हे उपस्थित होते.

Har Ghar Tiranga : प्रत्येक नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे – एकनाथ पवार

स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल या ठिकाणी सीआरपीएफ मधील 242 बटालियनचे कमांडर ऑफिसर  पारसनाथ व त्यांच्या 60 जवान या कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलने जवानांचे औक्षण केले ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील विद्यार्थिनींनी जवानांसाठी खास राख्या बनवल्या होत्या. त्या 1500 राख्या कमांडर ऑफिसर पारसनाथ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्या राख्या पुढे सीमेवर तैनात असलेले जवान यांच्यासाठी पाठविण्यात आल्या.

स्माईल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये (Rotary Club) केंद्राचे संचालक हर्षल पंडित यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन आयोजित केला होता. प्रकल्पप्रमुख रो वैशाली खळदे, रो रेश्मा फडतरे व रो सुनंदा वाघमारे फर्स्ट लेडी मालती फल्ले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले व प्रास्ताविक सुरेश दाभाडे यांनी केले रो शाईन शेख यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.