Talegaon Dabhade : रोटरी गोर गरीब रुग्णांसाठी नक्की हातभार लावेल – विलास काळोखे

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्राला बाकडे प्रदान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीतर्फे तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रुग्णांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे रुग्णांना मोठी मदत होणार आहे. गोरगरीब रुग्णांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी नक्की हातभार लावेल, असे मत संस्थापक रो. विलास काळोखे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नितीन मराठे यांच्या शुभहस्ते बाकडे प्रधान लोकार्पण सोहळा पार पडला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सोयीसुविधा पुरवाव्यात असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी केले.

काळोखे पुढे बोलताना म्हणाले की, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी गोर गरीब रुग्णांसाठी नक्कीच हातभार लावेल असे आश्वासन दिले. व जागरूक कट्ट्यावरील पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठांसाठी बाकड्यांची मागणी केल्याने, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ते काम केल्याचे काळोखे यांनी सांगितले.

प्रमुख उपस्थितमध्ये रो सुरेश धोत्रे, रो दिलीप पारेख,नितीन शाह,निवृत्ती फलके, श्री काळे उपस्थित होते. प्रकल्पप्रमुख किरण ओसवाल, माजी अध्यक्ष संतोष शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शेंडे, संजय मेहता, तानाजी मराठे,संतोष परदेशी,बाळासाहेब रिकामे, सुनील महाजन,शरयू देवळे, रेशमा फडतरे, रिजवाना शेख व विश्वास कदम यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन संतोष लोणकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.