RSS : संघाची बदनामी करण्याच्या हेतूने समाज माध्यमांतून मजकूर पसरविला जातोय

एमपीसी न्यूज : जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ (RSS) तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासंबंधाने पोलिस, सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार व आपली सर्वांची श्रद्धा असलेल्या महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे. पोलीस व सायबर क्राइम विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली, असून पोलिस यंत्रणांनी तपास सुरू केला असल्याची माहिती करपे यांनी दिली.

रा. स्व. संघ व संघ विचारांनी चालणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याच्या हेतूने फेसबुकवर `RSS संघराज` नामक फेसबुक पेज व इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे. त्यासोबतच कै. बाबासाहेब पुरंदरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची टिप्पणी करीत धादांत खोटा व अपप्रचार करणारा व हेतुपुरस्सरपणे संघाची बदनामी करणारा मजकूर व्हायरल केला जातो आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असेही करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हणले आहे.

Maharashtra Monsoon Assembly Session Live : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन 2022 अपडेट

`RSS संघराज` नामक फेसबुक पेज हे बनावट असून रा. स्व. संघाकडून (RSS) वा स्वयंसेवकांकडून असा कोणत्याही प्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला गेलेला नाही. रा.स्व. संघ व संघ स्वयंसेवकाची बदनामी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक असा मजकूर पसरवला जातो आहे. पोलिस व संबंधीत सायबर यंत्रणांनी याची दखल घेत चौकशी करावी व तातडीने कारवाई करावी अशी मागणी रा.स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.