Self-immolation attempt : विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; शेतकऱ्यावर उपचार सुरु  

एमपीसी न्यूज – राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु असतानाच विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालायात दाखल केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. देशमुख सातारच्या कांदळगावचे आहेत.

विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु आहे. असे असतानाच विधीमंडळाबाहेर हा प्रकार घडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे आणि घोषणाबाजीमुळे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक गावांत शेतीचं अतोनात नुकसान झाले आहे.काही गावांमध्ये जनावंर दगावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरापाई द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून विधानभवनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-भाजप सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यांमुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरापाईची मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.