Terrorist Breaking News – दापोडीतून अटक केलेल्या दहशतवाद्याचा मोठा कट उघडकीस, ‘या’ तिघांवर करणार होते हल्ला

एमपीसी न्यूज : पुण्यातील दापोडी (Terrorist Breaking News) परिसरातून काही दिवसांपूर्वी जुनैद मोहम्मद या दहशतवादाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीनंतर जम्मू-काश्मीर येथून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांनी मिळून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ल्याचा कट रचला होता. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तिघांवर हल्ल्याचा कट या दहशतवाद्यांनी रचल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. इतकंच नव्हे तर आगामी काळात हे भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचंही निष्पन्न झाले आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील दापोडी परिसरातून जुनेद मोहम्मद याला २४ मे रोजी ताब्यात घेतले होते. जुनेद मोहम्मद हा सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने आत्तापर्यंत १७ हून अधिक फेसबुक अकाउंट तयार केले होते आणि त्याद्वारे तो इतरांशी संवाद साधायचा. दहशतवादी कारवायासाठी तरुणांची भरती करण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात बसलेल्या एका मास्टरमाईंडकडून येणार होते.

जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार (Terrorist Breaking News) दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींना मारण्याचा जो कट रचला होता, त्यासाठी निघण्याच्या तयारीत जुनेद होता. मात्र, त्याआधीच दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली होती. काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे या आधी झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असणारे हे तिघे कोण? Terrorist Breaking News

संदीप आचार्य –

संदीप आचार्य हे उत्तर प्रदेशचे असून वादात सापडलेल्या गणायांचे ते लेखक आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक म्हणून देखील आचार्य यांची ओळख आहे.

नरसिंहानंद सरस्वती –

नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमधील असलेल्या शिवशक्ती धामचे महंत आहेत. ते हिंदू स्वाभिमान नावाची संस्था देखील चालवतात. त्यांनी अनेक वेळा प्रक्षोबक वक्तव्ये केली आहेत

जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी –

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिजवी यांनी सनातन धर्मात प्रवेश केला होता. या कारणाने या तिघानवर हल्ला करण्याचे प्रयोजन दहशतवादी पथकाने उधळून लावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.