Nigdi News : व्हाट्सअप बघत चाललेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला 

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालताना व्हाट्सअप वरील मेसेज पाहत चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल चोरट्यांनी हिसकावला. ही घटना 28 एप्रिल रोजी सकाळी प्राधिकरण निगडी येथे घडली.

भीमराव रघुनाथ कांबळे (वय 26, रा. रेल विहार कॉलनी जवळ, बिजलीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी कांबळे हे संजय काळे मैदानाजवळ, प्राधिकरण निगडी येथून रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी ते व्हाट्सअप वरील मेसेज पाहत होते, अचानक संभाजी चौकाकडून एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने खेचून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.